वाचणाऱ्याची रोजनिशी, लेखक-सतीश काळसेकर Vachnaryachi Rojnishi by Satish kaleskar Book review in Marathi

     "वाचता वाचता आयुष्य संपाव. पण वाचन संपू नये. वाचनासाठीच का होईना पुनर्जन्म परत परत मिळावा." हे वाक्य 'सतीश काळसेकर' यांनी लिहिलेल्या वाचणाऱ्याची रोजनिशी या पुस्तकातील आहे. नव्याने वाचनाची सुरवात करणाऱ्या नवख्या वाचकांसाठी हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे. वाचन म्हणजे काय असते? ते कसे व किती असू शकते? याचा सारासार विचार मन व्यापून टाकतो. काळसेकारांच्या या पुस्तकाला 2013 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

    .

Vachnaryachi Rojnishi by Satish kaleskar Book review in Marathi
Vachnaryachi Rojnishi by Satish kaleskar Book review in Marathi


पुस्तक : वाचणाऱ्याची रोजनिशी :: लेखक : सतीश काळसेकर 
            प्रकाशन : लोकवाङ्मय गृह  :: प्रस्तावना : अरुण खोपकर    
मुखपृष्ठ : सतीश भावसार :: किंमत :३०० रु.      
 
    वाचनाची आवड निर्माण होवून ती व्यसनापर्यंत नेण्याची ऊर्जा या पुस्तकातुन मिळते. काही कारणाने वाचन खंडित झालेल्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होवून, त्यासाठीचा खुराक शोधने आणि तो पुरविणे यावर मन आणि मेंदू तत्पर करण्यात पुस्तकाला यश आहे. वाचन सुटल्यामुळे आपण खूप काही गमावल्याची मनातील सल आणि त्याची जाणीव निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण खूप वाचन केले. विविध प्रकारचे लेखन, विषय, भाषा, संस्कृती, नियतकालिके, स्तंभलेख इत्यादी प्रकार वाचुन वाचुन अक्षरशः त्याचा पाला पाडला. या प्रदिर्घ वाचन क्रियेनंतर आपण प्रगल्भ झालो आहोत. त्यामुळे वाचन कमी किंवा बंद झालं. तसेच  वाढते वय, कामाची व्यस्तता, थकलेले शरीर इत्यादी पैकी कोणत्याही कारणास्तव वाचनातील संथता किंवा अनियमितता याकडे झुकलेल्यांमध्येही अनामिक ऊर्जा निर्माण होवून, अपुर्णत्वाची जाणीव हे पुस्तक वाचतांना नक्कीच होत असेल. 

      अगदी लहानपणापासून वचनाची आवड असलेल्या लेखकाने विविध प्रकारचे प्रदिर्घ वाचन सातत्याने चालू ठेवले. त्यासाठी त्यांनी खूप कष्टे उपसली. परिवार, मित्र, नातलग यांनाही या स्वभावाचे चटके बसले. मात्र लेखकाचे वाचनप्रेम वाढवण्यात त्यांनीही हातभारच लावला. त्यामुळे पुस्तके व त्यासंबंधीचा पसारा वाढत गेला. तो आजतागायत अखंडित सुरू आहे.


Vachnaryachi Rojnishi by Satish kaleskar Book review in Marathi
Vachnaryachi Rojnishi, by Satish kaleskar

     उतार वयाचा आलेख पुढे सरकत असतांना मोकळा वेळ खूप असला, तरी शारिरीक अडचणी पाय रोवत आहेत.  त्यामुळे वाचनाचा वेग मंदावतो खरा, मन मात्र अजिबात थकत नाही. खूप पुस्तके वाचून झाली असतील. त्यातील कित्येक अवतीभवती वावरत आहेत. परंतु आवर्जून वाचावीत अशी खूप पुस्तके, लिखाण अजुन बाकी आहे. या विचारानेच लेखकाचे मन थकत असावे. त्यामुळे लेखक म्हणतात.

          "आता आयुष्य तसे उतरणीला लागलेले. आणि हे आयुष्य तर एकमेव. खरे तर असे अनेकदा वाटते की, या ग्रंथाच्या वाचनासाठी तरी आपल्याला अनेक पुनर्जन्म मिळावेत. मुक्ती आपल्याला नकोच. एकतर आपल्या आधी हजारो वर्षे लिहिनार्यांनी पृथ्वीच्या अवघ्या पाठीवर विपुल लिहुन ठेवले आहे. आणि नव्याने लिहिणारे लिहितच आहेत. त्यातले खूप वाचन्यासारखे असते आणि असणारच. वाचणाऱ्याची ही सगळ्यात अवघड दुखण्याची जागा. "

     
"वाचता वाचता आयुष्य संपाव. पण वाचन संपू नये. वाचनासाठीच का होईना पुनर्जन्म परत परत मिळावा."
       
   या विचारातुन वाचनारांना ऊर्जास्त्रोत आणि दिशा मिळाते. याचा परिणाम जेव्हढा नवख्यावर, तेव्हढाच खंडित झालेल्यांना वाचनाच्या वाटेवर सुसाट वेग देणारा. त्याचबरोबर वाचनक्रियेत सातत्य असणाऱ्यांनाही दृढ मनोबल देवुन त्यांचे वाचन विश्व निखळुन टाकणारा आहे. 

        पुस्तकाला 'अरुण खोपकर' यांची प्रस्तावना आहे. तर पुस्तकाचे मुखपृष्ठ 'सतीश भावसार' यांचे आहे. मुखपृष्ठावरील वारली चित्रकला अतिशय सुबक असून ती सहज आपले लक्ष वेधून घेते.

'सतीश काळसेकर' लिखित वाचणाऱ्याची रोजनिशी या पुस्तकाला 2013 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे.


No comments: